चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. राज्यावर करोनाचं संकट असून गुढीपाडवा साजरा केला जात आहे. राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आलेली असून एरव्ही मोठ्या जल्लोष आणि उत्साहात साजरा केला जाणारा गुढीपाडवा मुंबईत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.