दिवसेंदिवस वाढत्या रूग्णसंख्येमुळे आता रूग्णलायांमधील बेड्स देखील अपुरे पडत आहे. परिणामी रूग्णांचे हाल असल्याने, सरकारी यंत्रणांकडून शक्य त्या अन्य उपयांचा देखील विचार केला जात आहे. दरम्यान, करोना विरूद्धच्या या लढ्यात आता रेल्वे विभागानेही पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. वाढत्या रूग्ण संख्येमुळे ज्या राज्यांकडे आयसोलेशन बेड्स उपलब्ध नसतील त्यांच्यासाठी आता रेल्वे विभागाने आयसोलेशन कोच उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.