करोना परिस्थितीला तोंड देत असतानाच राज्यातील आरोग्य विभागासमोर एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज आहे. ही गरज ओळखून चेतन आणि स्वाती यांच्या विवाह सोहळ्या प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विवाह लोणी तालुका जामनेर येथील श्री गजानन महाराज मंगल कार्यालयात पार पडला.