वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला धरणावर गेलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नाशिक शहरातील सिंहस्थनगर, मोरवाडी सिडको परिसरातील नऊ जणांपैकी पाच मुली आणि एक मुलगा असा सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (१६ एप्रिल) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.