करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केलेली असली, तरी रस्त्यावर आणि लोकलमध्ये गर्दी कमी झाल्याचं दिसत नाही. या गर्दीवर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली असून, कडक लॉकडाउन करण्याबद्दल भूमिका मांडली आहे.