मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकात पॉइण्टमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून एका चिमुकल्याचे प्राण वाचवले. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरुन चालत असताना तोल गेल्याने एक लहान मुलं रेल्वे ट्रॅकवर पडले. त्याचवेळी समोरुन एक्सप्रेस येत होती. मात्र यावेळी प्रसंगावधान राखत तेथे असलेल्या मयुर शेळके या पॉइण्टमनने धावत जात या मुलाला पुन्हा फ्लॅटफॉर्मवर लोटत स्वत:ही एक्सप्रेस येण्याआधी प्लॅटफॉर्मवर उडी घेत मुलाचा जीव वाचवला.