करोना रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह मिळण्यास विलंब झाल्याने अंबरनाथ एमआयडीसीमधील विजय कोविड रुग्णालयात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये रुग्णालय कर्मचारी आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसत आहे. पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.