राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने परराज्यातून ऑक्सिजन पाठवावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. या विनंतीला केंद्र सरकारने प्रतिसाद दिला असून आज कळंबोली येथून ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे. या ऑक्सिजन एक्सप्रेस मधून १० ट्रक जाणार असून विशाखापट्टणम, जमशेदपूर, रुरकेला आणि बोकारो येथे हे ट्रक रवाना होणार आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होतील.