मनमाड शहरात गर्दी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना आता त्यांना तृतीयपंथीयांची मदत मिळत आहे. प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तृतीयपंथी करोना योद्धे म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाकडून त्यांना ओळखपत्र देण्यात आलं असून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.