रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी केली होती. या चौकशीवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. फडणवीस आणि भाजपा नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेवरून मलिक यांनी पलटवार केला आहे.