एकीकडे सुविधा मिळत नसल्याने करोना रुग्णांचे हाल होत असताना राज्यभरातील तरुणांनी एकत्र येऊन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २०० करोना रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. ‘सपोर्ट फॉर कोविड पेशंट’ असे या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव आहे.