सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये एकनाथ खडसे भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करत असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑडिओ क्लिपच्या सत्यासत्यतेविषयी खात्री होऊ शकली नसली, तरी गिरीश महाजनांनी यावर “खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”, अशी खोचक प्रतिक्रिया देखील दिली आहे.