एकीकडे भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असताना दुसरीकडे इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एक परदेशी खेळाडूने सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. कमिन्सने केलेल्या मदतीवरुन टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवरच जाणून घेऊयात नक्की कोणत्या खेळाडूने किती आर्थिक आणि इतर पद्धतीची मदत देशवासियांसाठी करोना काळात केलीय…