राज्याच्या राजकारणातील ज्वलंत विषय असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा रद्द केला आहे. मात्र, हा निकाल देत असताना न्यायालयाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जाणून घेऊया न्यायालयाने नक्की काय म्हटलं आहे…