नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. नाशिक पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चांगलाच चोप दिला. कडक लॉकडाउन मुळे नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट होत आहे.मात्र नागरिकांनी यापुढे नियम पाळले नाहीत तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते.म्हणुन नाशिक पोलिसांनी आक्रमक होत लोकांना लॉकडाऊनची आठवण करून दिली.