“आपण झाडं तोडणं थांबवू शकत नाही, पण नवीन झाडं नक्कीच लावू शकतो.” आईचा हा सल्ला बोधिसत्वला खूप भावला. तो ‘सीड बॉल्स’च्या माध्यमातून झाडं लावतो आणि ‘सीड बॉल्स’च्या कार्यशाळादेखील घेतो. त्याची ‘सीड बॉल’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. ‘ग्रीन पाऊच’ आणि ‘मॅजिक सॉक्स’ नावाच्या सामाजिक वनीकरणाच्या दोन सोप्या पध्दती त्याने शोधून काढल्या आहेत.