शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब वायकर यांनी विनायक मेटेंच्या गाडीचा जवळपास २ किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला आहे. ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं ते म्हणाले. यानंतर या अपघाताबद्दल त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला आहे.