भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची आज प्राणज्योत मालवली. विविध पक्षातील अनेक नेत्यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. या अंत्ययात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले.