सध्या सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाच्या विषयावर सुनावणी सुरू आहे. सध्या न्यायालयात सुरू असलेला युक्तिवाद आणि येऊ घातलेला निवाडा याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. समलिंगी नातेसंबंधावर अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून भाष्य केले जाते. कधी बाजूने, तर कधी विरोधात अधिकारवाणीने मतप्रदर्शन केले जाते. पाश्चिमात्य देशांकडून हे फॅड भारतात आले आणि भारतात अशा स्वरूपाचे प्रकार कधी नव्हतेच असेही सांगितले जाते. प्राचीन काळातील पुढारलेला आणि समृद्ध भारत खरंच समलिंगी संबंधांच्या संकल्पनेपासून अनभिज्ञ होता का, हे पाहणे आवश्यक ठरते. त्यानिमित्ताने मध्ययुगीन भारताचा या संदर्भातील इतिहास जाणून घेऊयात