राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील कोयना विभागात सुट्टीवर आपल्या मूळ जन्मगाव दरे तांब येथे हेलिकॉप्टरने सुट्टीवर आले आहेत. मुख्यमंत्री गेल्या एक दिवसापासून आपल्या कोयना विभागात सुट्टीवर आले असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा व तर्कवितर्क काढले जात आहेत.