Chandrakant Patil on Ajit Pawar: पुण्यातील बैठक सुरू होण्यापूर्वीच चंद्रकांत पाटलांचा मिश्किल सवाल
पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पाणी नियोजनाबाबत कालवा समितीची आज व्हीआयपी सर्किट हाऊस येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारा वाजता बैठक आयोजित करण्यात आली यावेळी चंद्रकांत पाटील बैठकीठिकाणी उपस्थित झाले आणि समोर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना विचारले की, ‘अजितदादा आले का ?’ अधिकाऱ्यांनी नाही असं उत्तर दिल्यावर ‘मी अजितदादांसाठी धावपळत आलो आहे. आज पुन्हा गायब झाले की काय?’ असं मिश्किलपणे म्हणताच एकच हशा पिकला.