Ajit Pawar: नागपुरात फडणवीसांच्या घरासमोरच अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून फलक | Nagpur
‘वचनाचा पक्का आणि हुकुमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजित दादा पक्का..’ अशा आशयाचे बॅनर नागपुरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ शांती भवन चौकात लावले गेले आहे. यात अजित पवार भावी मुख्यमंत्री होतील असे लिहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांच्याकडून हे बॅनर लावले गेले आहे