Sangli People In Sudan Crisis: सुदानमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत यादवी युध्दामुळे Sangli जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून बाराशे किलोमीटरवर हे नागरीक अडकले आहेत. सुदानमध्ये युध्द सुरू असल्याने अनेक भारतीय नागरिक सुदान मध्ये अडकले (Sangli People Stuck in Sudan) आहेत. परराष्ट्र खात्याकडून Operation Kaveri अंतर्गत भारतीय नागरिकाना मायदेशी आणले जात असून आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. मात्र इतर लोकांनाही मायदेशी आणावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.