भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख तथा भाजपाचे नेते बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. यासाठी कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन पुकारलं आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पीडित महिला खेळाडूंना पाठिंबा दर्शवला आहे. या मुलींना न्याय द्या असं आवाहनही, उर्मिला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केलं आहे.