माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतःचे १९ बंगले गायब केले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या १९ बंगल्यांच्या गायब झालेल्या फाईल्स आणि बंगल्यांची चौकशी करा, अशी मागणी सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पत्रकार परिषद घेत सोमय्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणात आता एकनाथ शिंदेंची भूमिका काय असेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.