गणित म्हणजे कठीण विषय असाच अनेकांचा समज आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील एका शिक्षकाने हा कठीण विषय सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षक अभिजित भांडारकर यांनी तब्बल १०८० गणिताची सूत्र संगीताच्या तालावर बसवली आहेत. गणित आणि गीत याची सांगड घालण्यात त्यांना यश आलं आहे. त्यामुळे विद्यार्थीही आनंदाने त्यांच्याकडून हे धडे घेत आहेत. गाण्याच्या माध्यमातून गणिताचे धडे देण्याऱ्या या अनोख्या संकल्पनेची दखल इंडिया, एशिया आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली आहे.