बारसूत रिफायनरीविरोधात ग्रामस्थांची भूमिका ठाम आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत असलेले ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. तसंच सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांची अडवणूकही पोलिसांकडून करण्यात आली. तरीही गावकऱ्यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे सध्या बारसूतील वातावरण तापल्याचं चित्र आहे.