बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. माती परीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले होते. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना अडवल्यानंतर परिसरात एकच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रमास्थांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच ग्रासस्थांच्या संमतीनेच हा प्रकल्प पुढे नेला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.