भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर केलेल्या लैगिंक शोषणाच्या आरोपाची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात पोक्सोसह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं कुस्तीपटूंनी म्हटलं आहे. अशातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी जंतरमंतरवर कुस्तीपटूंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला .