बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारलं होतं. यावेळी आंदोलकांना पोसिलांनी रोखलं त्यामुळे येथील वातावरण तापलं होतं. यावरून खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. परदेशात बसून देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांवर बळाचा वापर करावा, असा आदेश दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.