भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. आपण निर्दोष आहोत आणि आरोपी म्हणून राजीनामा देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या भूमिकेवर त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.