पुणे जिल्ह्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १७ जागांवर विजय मिळाला, तर भाजपा, शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावं लागलं. मावळची जनता ही मविआ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे आजच्या निकालातून स्पष्ट झालं, असं आमदार सुनील शेळके म्हणाले.