रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवत आंदोलन पुकारलं होतं. सध्या प्रकल्पासाठी माती परिक्षाणाचं काम सुरू आहे. प्रकल्पासाठी ग्रामस्थांचा विरोध वाढत असून राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत आज बैठक घेतली. खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतरावही उपस्थित होते. यावेळी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी
उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.