भिवंडीतील वळपाडा भागात तीन मजली इमारत शनिवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. तसंच दहा ते बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात असून, त्यांना शोधण्याचं काम राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल रात्री उशिरापर्यंत करीत होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री घटनास्थळाला भेट दिली. तसंच रुग्णालयात दाखल जखमींचा भेट घेतली.