बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बारसूमध्ये जाणार आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं होतं. त्यावर आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.