राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह संवाद साधला. एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला (शिंदे गट) या निवडणुकीत फटका बसला आहे. यावरून अजित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावला.