नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेड येथे आले असता ‘राज्यात सध्या सत्ता बदलाचे वारे वाहत आहे त्याबद्दल काय सांगाल?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना महाजन म्हणाले, “काही वारे वाहत नाही आहेत, या फक्त तोंडाच्या वाफा आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यकारभार सुरळीत चालू आहे. काही अल्पसंतोषी लोकं आहेत त्यांना स्वप्न पडायला लागली आहेत” त्याचबरोबर “मुख्यमंत्री व्हायचे तर १२५ आकडा पाहिजे आणि तो कोणीही आणावा आणि मुख्यमंत्री व्हावे” असा टोलाही मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.