आज महाराष्ट्र दिन साजरा केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी मोठा संघर्ष करण्यात आला होता. याच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आज अस्थिर असल्याचं चित्र आहे. या प्रश्नावर खासदार संजय राऊतांनी राज्यातील शिंदे आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. देशाच्या पंतप्रधानांना संविधानापेक्षा मन की बातवर जास्त प्रेम आहे, अशी टीकाही केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.