Priyanka Gandhi On PM Modi: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election 2023) १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी मतमोजणी होत, निकाल जाहीर होईल. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ( २९ एप्रिल ) ‘काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या,’ असं म्हणतं टीका केली होती. याला आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.