PM Modi: मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक? कर्नाटकात रोड शो दरम्यान मोदींवर महिलेने फेकला मोबाईल
कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झालेली आढळून आली आहे. पंतप्रधान मोदी म्हैसूरमध्ये रोड शो करत असताना एका महिलेने मोदींवर मोबाईल फेकला मात्र, हा मोबाईल त्यांना लागला नाही तो त्यांच्या समोरच पडला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मोदी भाजपा नेत्यांसोबत रथावरून उपस्थितांना अभिवादन करत होते. ही अचानक घडलेली घटना माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली