‘२०२४ला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री’; भर सभेत हातात बॅनर घेऊन उभा असणारा ठाकरेंचा मुस्लिम मावळा चर्चेत
छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरातील सभेनंतर मविआ आता ‘वज्रमूठ’ सभा मुंबईमध्ये घेत आहे. आज म्हणजेच १ मे ला होणारी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा ही मुंबईतील बीकेसी मैदानावर होत आहे. यावेळी या सभेदरम्यान एक मुस्लिम मावळा लक्ष वेधून घेत आहे. “उद्धव ठाकरे हे आमच्या मनातील परमनंट मुख्यमंत्री आहेत. अडीच वर्षात त्यांनी जे काम केलं त्यामुळे आम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत” अशी प्रतिक्रिया देत हा मावळा हातात फलक घेऊन सभेला आलेला पाहायला मिळाला