महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी येथे पार पडली. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणात राज्यातील राजयकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तर गेल्या दहा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून किती चुका झाल्या हेही त्यांनी सांगितलं.