नेहमीच आपल्या कवितांनी हास्यकल्लोळ करणारे नेते रामदास आठवले हे भर सभेत चिडल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील तळेगाव येथे जाहीर सभेत त्यांना राग अनावर झाला. पुणे जिल्ह्यात कोयता गॅंग सक्रिय असल्याचं सांगत असताना कार्यकर्त्यांनी मध्येच फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. भाषणात व्यत्यय आल्याने त्यांनी जवळच उभा असलेल्या पदाधिकाऱ्याला त्यांनी सुनावलं “यांना अक्कल नाही का? मध्येच आगाऊपणा करतात. त्यांना चांगले धडे द्या, चांगलं शिकवा” असं म्हणत त्यांनी राग व्यक्त केला.