बारसू रिफायनरी प्रकल्प: “तुम्हाला कसली भीती वाटतेय?”; राजू शेट्टी मुख्यमंत्र्यांना लिहणार पत्र
बारसूत प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांकडून कडाडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी बारसूमध्ये जाणार होते. मात्र रत्नागिरी पोलिसांनी राजू शेट्टींना ३१ मे पर्यंत जिल्हा बंदीची नोटीस बजावली आहे. यावर राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त करत आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असं म्हटलं आहे.