उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘वज्रमुठसभा म्हणजे निराश झालेल्यांचे अरण्यरुदन आहे. आपल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने सांगण्यासारखा एकही विकास प्रकल्प राबवला नाही. त्यामुळे आता त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. आम्ही निवडणुका घेऊ आणि तुम्हाला हरवूसुद्धा. महाविकास आघाडी नेते तोल गेल्यासारखे भाष्य करत आहे’ अशी टीका फडणवीसांनी केली.