राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. यावेळी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी भाषण केले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी राष्ट्रवादी नेते आणि प्रतिभा पवारसुद्धा भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या.