शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. निर्णय घेतल्याशिवाय आपण इथून हटणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते प्रपुल्ल पटेल हे कार्यकर्त्यांनी हट्ट करू नये, असं समजावत होते.