शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार असे बाजूला जाऊन चालणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या निर्णयानंतर राज्यासह देशाच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.