शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राज्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पवारांच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. राजीनामे दिले जात आहेत. अशीच परिस्थिती पुण्यात देखील पाहण्यास मिळत असून पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत असल्याचं जाहीर केलं. तसंच पुण्यात पक्षाच्या कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने यावेळी भूमिका मांडली.