गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा पसरल्या होत्या. त्या थांबवण्यासाठी शरद पवार हा मास्टरस्ट्रोक खेळले असावेत, असं विधान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी निवृत्ती घोषित केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांची प्रतिक्रिया देखील महत्त्वाची ठरते.